अमळनेरात वाढीव घरपट्टीविरोधात सहविचार सभा रविवारी — नागरिकांत वाढती नाराजी, पत्रकार संघाचा पुढाकार..

0
New-Doc-07-12-2025-22.12.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर नगरपरिषदेने घरपट्टी व दुकान भाडे करात केलेल्या वाढीव दरांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या रविवार, दिनांक १३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता न्यू प्लॉट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेचे आयोजन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले असून, शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी बांधव, पत्रकार बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेकडून घरांची मोजणी करून नवा सर्व्हे केला असून, त्यानुसार मोठ्या प्रमाणात कर वाढवून थेट नागरिकांना वाढीव रकमेची बिले पाठविण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून, ही वाढ अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, ही मोजणी पालिका कर्मचाऱ्यांकडून न करता बाहेरील खाजगी संस्थेला मोठा मोबदला देऊन केली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेत सध्या कोणताही लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांनी एकतर्फी निर्णय घेतल्याची टीका होत आहे.

यासंदर्भात नागरिकांना घरपट्टी वाढीव वाटत असल्यास त्यांनी हरकतीचे अर्ज पालिकेतून घेऊन हरकती नोंदवाव्यात, अन्यथा वाढीव कर लागू राहणार, अशी माहिती असून, या पार्श्वभूमीवर जनतेत प्रचंड असंतोष आहे.

या सहविचार सभेच्या माध्यमातून सर्व संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांची भूमिका समजून घेतली जाणार असून, त्यानंतर आमदार, खासदार यांच्याकडे निवेदनाद्वारे जनभावना पोहोचविण्यात येणार आहेत.

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने नागरिकांना या सभेला विचारपूर्वक उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1125/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed