गुरुपौर्णिमेनिमित्त असंख्य युवांची आमदार अनिल पाटलांना शुभेच्छा भेट..

0
New-Doc-07-12-2025-22.39.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर – गुरुपौर्णिमेच्या शुभदिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वंदन केले आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.

गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनातील गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. जीवनात दिशा देणारे आई-वडील, शिक्षक, संत, मार्गदर्शक यांचा गौरव या दिवशी केला जातो. त्याच भावनेतून अमळनेर तालुक्यातील अनेक युवकांनी आमदार अनिल पाटील यांना आपला मार्गदर्शक मानून त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वंदन केले.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी युवकांच्या शुभेच्छा स्वीकारतांना भावनिक आणि प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी उपस्थितांना सांगितले की, “आपल्या आई-वडिलांची सेवा करा, सर्व वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान राखा. मेहनत, जिद्द आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर तुमचे स्वप्न पूर्ण करा. आरोग्याची काळजी घ्या आणि यशस्वी आयुष्य घडवा.”

यावेळी उपस्थित युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि आमदार पाटलांनी दिलेला सल्ला अनेकांच्या मनाला भावून गेला.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1125/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed