एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचा एकता संघटनेतर्फे सत्कार.
24 प्राईम न्यूज 20 May 2025

जळगाव – महाराष्ट्र राज्यात ‘शंभर दिवस उत्कृष्ट कार्य’ उपक्रमांतर्गत पारदर्शकता, कायदा व सुव्यवस्था, तपास, पायलिंग व इतर कार्यक्षेत्रात एमआयडीसी पोलीस स्टेशनने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचा एकता संघटनेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी शाल अर्पण करून, तर मुफ्ती खालीद यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक पाटील यांचा गौरव केला. हा सत्कार एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे करण्यात आला.
याप्रसंगी एकता संघटनेचे अनिस शहा, हाफीज रहीम पटेल, मौलाना उमरेन नदवी, मौलाना इमरान काकर, सईद फैयाज, दानिश बागवान, मौलाना कासिम नदवी, अन्वर शिकलगर, मझहर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
