एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांसाठी सकस आहार वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -रोटरी क्लब व आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून ३० गरजू बालकांना मदत..

0
New-Doc-05-19-2025-23.22.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – रोटरी क्लब अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या अंकुर सेवा सेतू प्रकल्पा अंतर्गत एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात ३० अति गरजू मुलांना दर महिन्याप्रमाणे किराणा व प्रोटीन कीट वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इद्रिस हुसेन बोहरी हे होते. विशेष म्हणजे, रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला आणि सौ. निसरीन बुकवाला यांच्या चि. सैफुद्दीन बुकवाला यांच्या वाढदिवसानिमित्त ३० प्रोटीन किट्सचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात रोटेरियन अभिजीत भांडारकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी मुलांशी आरोग्य विषयक संवाद साधत, दात्यांचे आणि संस्थांचे योगदान कसे मोलाचे आहे हे सांगितले. बोहरी कुटुंबातील फरिदा बोहरी, तसनिम बोहरी, जमीला सैफी, तैखुम सैफी यांनीही मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी सांगितले की, “मुलांना दर महिन्याला सकस आहार व प्रोटीन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अमळनेरातील अधिकाधिक दात्यांनी पुढे येऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, हीच अपेक्षा आहे.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणु प्रसाद, रोटरी क्लबचे सदस्य देवेंद्र कोठारी, महेश पाटील, चेलाराम सैनानी, आशिष चौधरी, प्रेसिडेंट ताहा बुकवाला यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक आश्विनी सूर्यवंशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनात दीपक संदानशिव, संजय कापडे, पुनम पाटील, आनंद पगारे, तौसिफ शेख आणि अतीत जैन यांचेही मोलाचे योगदान होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed