ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना ‘भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार’ जाहीर.

0
New-Doc-05-19-2025-22.14.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना यंदाचा ‘भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पत्रकारितेतील त्यांचे योगदान लक्षणीय असून, ते एक अभ्यासू आणि सशक्त लेखणी असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी लोकमत समूहात प्रदीर्घकाळ सेवा बजावली असून त्यांच्या कार्याची सर्वत्र दखल घेतली गेली आहे.

मुंबई येथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या परिषदेमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. याच वेळी मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, इतर काही मान्यवरांनाही विविध पुरस्कार दिले जाणार आहेत.

पांडुरंग पाटील यांच्या या सन्मानाबद्दल अमळनेर परिसरातून आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे जोरदार अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed