पाळधी आगग्रस्त २३ दुकानदारांना १५ दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास आमरण उपोषणाला बसणार..
24 प्राईम न्यूज 17 May 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 94700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
आगग्रस्त व एकता संघटनेची प्रशासनास नोटीस

३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी मौजे पाळधी तालुका धरणगाव येथील धर्म बघून २३ दुकानांना लुटून आग लावली होती त्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर १/२५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर प्रकरणी आगग्रस्त २३ दुकानदारासह जळगाव जिल्हा एकता संघटनेने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्यापासून म्हणजे २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सात दिवस धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने प्रतिनिधी म्हणून निवासी उप तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन व धरणगाव तहसीलदार यांनी शासकीय नुकसान भरपाई आपल्याला लवकरच मिळेल असे लेखी आश्वासन दिले होते परंतु आता सुमारे पाच महिने होत आले तरी शासनाकडून काही एक मदत न मिळाल्याने आगग्रस्त दुकानदार व एकता संघटनेने आमरण बेमुदत उपोषणाची नोटीस प्रशासनाला दिलेली आहे.
सदर नोटीसीची प्रत मा. मुख्यमंत्री, मा. आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मा. पालकमंत्री जळगाव सह मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जळगाव, पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस निरीक्षक एमआयडीसी व धरणगाव पोलीस स्टेशन, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग यांना सिद्धात देण्यात आलेल्या आहेत.
आमरण उपोषणाच्या नोटीसीवर यांच्या आहे स्वाक्षरी
एकता संघटनेतर्फे फारुक शेख, अनिस शहा, आरिफ देशमुख, मजहर पठाण , मतीन पटेल, अन्वर खान, हाफिज रहीम पटेल, तर आग्रस्तां तर्फे जावेद पिंजारी, शेख आणि शेख फारुख शरीफ , शकील शेख अब्दुल्ला व यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
