वादळी पावसात वीज पडून चार बैल ठार; उन्हाळी पिकांचेही मोठे नुकसान,यात्रेवरही पावसाचा फटका..

0
New-Doc-05-17-2025-06.52.jpg


आबिद शेख/अमळनेर

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 94700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर तालुक्यात १६ मे रोजी दुपारी साडेचार वाजता अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. या पावसात कान्हेरे व फापोरे गावांमध्ये वीज पडल्याने चार बैल ठार झाले आहेत.

अमळनेर येथील विश्वसनीय नाव

कान्हेरे येथे शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील आणि ज्ञानेश्वर धनराज पाटील यांच्या गट क्रमांक १२/१ मधील बैलजोडीवर वीज कोसळली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. तर फापोरे येथे प्रकाश मोतीराम पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या घराबाहेर बांधलेल्या बैलजोडीवर वीज कोसळल्याने ती बैलजोडीही ठार झाली.

याशिवाय, या अचानक आलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून उन्हाळी बाजरी, मका यासारख्या पिकांवरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाकडून मदतीची मागणी होत आहे.

अवकाळी पावसामुळे सखाराम महाराज यात्रेत दुकानदारांची पडांपड; मीना बाजार ओसाड

सखाराम महाराज यात्रेला यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दरवर्षी गर्दीने फुलून जाणारी ही यात्रा यंदा मात्र ओलसर वातावरणामुळे ओस पडलेली दिसली. विशेषतः महिलांचे आकर्षण असणारा मीना बाजार यंदा पावसामुळे फिका पडला आहे.

पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून, अनेक दुकानदारांचे साहित्य ओलावल्याने नुकसान झाले आहे. काही दुकानदार तर अर्ध्यातून दुकान गुंडाळून परत जाताना दिसले.

महिलांसाठी आकर्षणाचा भाग असलेला मीना बाजार दरवर्षी खचाखच भरलेला असतो. पण यंदा पावसामुळे महिलांची गर्दी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
हवामानातील बदलामुळे यात्रा उत्सवावर परिणाम झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed