अमळनेर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे ७ डबे घसरले; खासदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 94700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
अमळनेर | अमळनेर रेल्वे स्टेशनवर कोळसा भरलेल्या मालगाडीचे तब्बल ७ डबे पट्ट्यांवरून घसरले. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रभर चाललेल्या अथक प्रयत्नांमुळे रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात यश आले असून, प्रवासी व मालवाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

या संकटाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या मेहनतीला सलाम करत, त्यांच्या मनोबलात भर घालण्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून आज सकाळी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा नाश्ता स्वयंसेवाभावनेतून वितरित केला.
या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. खासदार स्मिताताई वाघ यांचे कार्यतत्पर व संवेदनशील नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अपघातानंतर तातडीने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जानवे मंडळ अध्यक्ष श्री जिजाबनाना पाटील, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, खा.शि. संचालक निरज अग्रवाल, निवास मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे, सरचिटणीस समाधान पाटील, सौरभ पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
