पंचायत समिती, अमळनेर येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा..
अमळनेर /आबिद शेख. अमळनेर पंचायत समिती, अमळनेर येथे जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष श्री. हेमंत दादा भांडारकर होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख मान्यवर म्हणून प्रा. रविंद्र माळी, ॲडव्होकेट श्री. विवेक लाठी, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, माजी सरपंच सुरेश अर्जुन पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रांतिक अध्यक्ष सौ. भारती अग्रवाल, तालुकाध्यक्ष सौ. स्मिता चंदाणे, श्री. महेश बापू कोठावदे आणि वजन-मापे निरीक्षक श्री. राजपूत साहेब उपस्थित होते.
या वेळी ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यावर भर देण्यात आला. सौ. भारती अग्रवाल यांनी पर्यावरणपूरक साधनांचा दैनंदिन जीवनात उपयोग आणि निसर्ग समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. सुरेश पाटील यांनी ग्राहक आणि दुकानदार यांच्यातील सामंजस्याबाबत प्रास्ताविक केले, तर प्रा. रविंद्र माळी यांनी रासायनिक खतांचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. हेमंत दादा भांडारकर यांनी बँकिंग व्यवहार, वैद्यकीय क्षेत्र आणि दैनंदिन व्यवहारातील ग्राहक समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षक अधिकारी रुखसाना शेख, गोदाम व्यवस्थापक संगीता घोंगडे, सह-गोदामपाल ठाकरे भाऊसाहेब, सचिन निकम, नागो पाटील, सुनील वाणी, कृष्णा माळी, रोहित पोतदार, विजय पाटील यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. प्रविण गोसावी यांनी केले. या कार्यक्रमाला स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
