धावत्या मोटरसायकलला अचानक आग – माजी जिल्हा परिषद सदस्य अनर्थातून बचावले..

0
New-Doc-03-15-2025-08.29.jpg

आबिद शेख/अमळनेर

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप पाटील यांच्या मोटरसायकलने अचानक पेट घेतल्याची घटना 14 रोजी सायंकाळी 6 वाजता सम्राट हॉटेलजवळ घडली. सुदैवाने, त्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच मोटरसायकल सोडून लांब गेल्याने अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पाटील हे आपल्या बहिणीसह हळदीच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या मोटरसायकल (क्रमांक MH 19 AW 4046) मधून अचानक धूर निघू लागला. परिस्थिती ओळखून ते तात्काळ खाली उतरले आणि दूर झाले. त्याच क्षणी मोटरसायकलने पेट घेतला आणि काही वेळातच पूर्णपणे जळून खाक झाली.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनी तातडीने मदत कार्य हाती घेतले, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed