औरंगजेबाच्या कबरीवर तणाव: पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त..
24 प्राईम न्यूज 16 मार्च 2025
औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीप्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कबरीच्या परिसरात राज्य राखीव पोलीस दलाची (SRPF) तुकडी तैनात असून, १५ कर्मचारी आणि २ पोलीस अधिकारी सतत गस्त घालत आहेत. तसेच, दोन ठिकाणी नाकाबंदी आणि फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. पर्यटकांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जात आहे.
‘छावा’ चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीवरील वाद चिघळला आहे. काही राजकीय नेत्यांनीही ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे.
