२४ डिसेंबरच्या डेडलाईनवर आम्ही ठाम-मनोज जरांगे..

0
New-Doc-12-20-2023-07.58.jpg

24 प्राईम न्यूज 20 Dec 2023

फेब्रुवारीत अहवाल कधी येणार आम्हाला माहीत नाही. त्यात खूप शंका आहेत. क्युरिटेव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयात न टिकल्यास आमचा मोठा घात होईल. मुख्यमंत्र्यांची फेब्रुवारीची डेडलाईन आम्हाला मान्य नाही. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आम्हाला नव्याने आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनानंतर सरकारला दिला. सन १९६७ पासूनच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याचा लाभ रक्ताच्या नातेवाईकाना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्यावर आपण काही अंशी समाधानी आहोत, पण पूर्ण समाधानी नाही, असेही जरांगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed