अमळनेर येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ : १३ जणांवर हल्ला…
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर तालुक्यात दोन दिवसात 13 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असून तिघांना गंभीर चावा घेतल्याने धुळे येथे रवाना करण्यात आले किल्ला चौक ते झामी चौक या परिसरात जवळपास ५० ते ६० मोकाट कुत्रे फिरत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. कसाली मोहल्ल्हा येथील आखाडा चौकात एकाच कुत्र्याने हल्ला चढवत नववर्षीय अली खान मोहसीन खान नव वर्षीय शहानवाज शहा फिरोजशहा तर आठ वर्षीय प्रवेज शाहा या तिघांवर खेळत असताना एकाला पाठीवर दोघांच्या हातावर गंभीर जावा घेतला त्या पैकी मोहसीन व शहानवाज या दोघांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सार्वेटा येथील 40 वर्ष शशिकांत पाटील ताडेपुरा येथील सात वर्षाचा ईशांत भिल आरोही पाटील, कस्तुराबाई माळी, प्रशांत कोळी, राजेश रणदिवे, देविदास पवार, मयुरेश विसपुते, राम लखवाणी, व जयेश गायकवाड यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे त्याला उपचारासाठी धुळ्याला रवाना केल्या आहेत इतरांवर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रशासनाने या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
