रामानूजन अबंँकस आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

0
New-Doc-08-02-2023-07.34.jpg

एरंडोल ( प्रतिनिधि)जेष्ठ नागरिक संघ एरंडोल येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिमाखात पार पडला.या प्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून सम्यक इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका निता पाटील होत्या.जळगाव येथून आलेले रामानुजन अबंँकस व वैदिक गणित अकॅडमी चे संचालक अभय पाटील सर यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला तसेच यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. सदर स्पर्धेत सहभागी विद्यार्थी धनंजय पवार ,श्रीकांत बोरसे,मोहित खैरनार, युग परदेशी, कार्तिक महाजन ,कूणाल पाटील या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गूण मिळवून o+ ग्रेड प्राप्त केली तसेच त्या बद्दल त्यांना सन्मानचिन्ह गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच ३० विद्यार्थ्यांना देखील यात A+ ग्रेड मिळाली या यशाबद्दल उपस्थित पालक व प्रमूख अतिथी यांनी विद्यार्थी व एरंडोल येथील अबंँकस संचालिका वैशाली पाटील मॅडम यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed