मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का? धुळे रोडवरील चौफुलीवर स्पीड ब्रेकरची मागणी! हीरो शोरूमसमोरील ८०फुटी रोड चौफुली ठरतेय अपघातप्रवण; नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.

0

अमळनेर/आबीद शेख 


अमळनेर : अमळनेर शहरातील धुळे रोडवरील हीरो शोरूमसमोरील ८०फुटी रोड चौफुलीवर स्पीड ब्रेकर बसविण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. या ठिकाणी धुळे रोडवरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. तसेच नवीन ८०फुटी रोड क्रॉसिंग चौफुली असल्याने दोन्ही बाजूंनी लहान-मोठ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे या चौफुलीवर अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
धुळे रोडवरून अनेक वाहने वेगाने धावत असतात. त्यातच चौफुलीवरून दुसऱ्या रस्त्यावर वळणारी तसेच रस्ता ओलांडणारी वाहने यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. या परिसरात अनेकदा लहान-मोठे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याच रस्त्यावर पुढे सेंट मेरी शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न महत्त्वाचा आहे.


या चौफुलीवर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने स्पीड ब्रेकर बसवावा, तसेच आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही चौफुली अपघातमुक्त करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने या ठिकाणाची पाहणी करून तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed