अमळनेर बसस्थानकातील विकासकामांच्या दुसऱ्या टप्प्याचे आज भूमिपूजन.

0

अमळनेर/आबीद शेख


आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता सोहळा
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते अमळनेर बसस्थानकातील विविध विकासकामांच्या द्वितीय टप्प्याचा भूमिपूजन सोहळा आज, सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.


हा सोहळा आज सकाळी १० वाजता अमळनेर बसस्थानक परिसरात होणार आहे. बसस्थानकातील विविध विकासकामांच्या दुसऱ्या टप्प्याला यानिमित्ताने सुरुवात होणार असून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed