जळगाव जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांना मिळणार ‘नारी शक्ती ग्राम गौरव’ सन्मान नवरात्रोत्सवानिमित्त DL SOCIAL FOUNDATIONचा उपक्रम; नामनिर्देशनासाठी प्रस्ताव मागविण्यास सुरुवात.
अमळनेर/आबीद शेख

जळगाव : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून DL SOCIAL FOUNDATIONतर्फे जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘नारी शक्ती ग्राम गौरव सन्मान सोहळा–२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘गावच्या लेकींचा सन्मान, गावाच्या प्रगतीचा अभिमान’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शिक्षण, आरोग्य, शेती, व्यवसाय, स्वयंरोजगार, सामाजिक कार्य, क्रीडा, कला-संस्कृती, ग्रामविकास, पर्यावरण यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या महिलांचा या सन्मानासाठी विचार केला जाणार आहे.
नामनिर्देशनासाठी प्रस्ताव मागविले

जळगाव जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या नामनिर्देशनासाठी प्रस्ताव मागविण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेचे नामनिर्देशन नागरिकांना करता येणार आहे. प्राप्त प्रस्तावांची माहिती व संबंधित महिलेच्या कार्याची पडताळणी करून संस्थेच्या निर्धारित निकषांनुसार सन्मानार्थी महिलांची निवड केली जाणार आहे.

समाज, कुटुंब, गाव आणि परिसराच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांनी तसेच त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन DL SOCIAL FOUNDATIONच्या संचालिका भावना मैराळे व संचालक डॉ. समाधान मैराळे यांनी केले आहे.
‘कर्तृत्वाला सलाम, नारी शक्तीला मान!’
DL SOCIAL FOUNDATION – समाजासाठी समर्पित
📞 संपर्क : 7796112894
डॉ. समाधान मैराळे — संचालक
सौ. भावना समाधान मैराळे — संचालिका

