लेखी आश्वासनानंतरही मागण्या प्रलंबित; आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस.

0

अमळनेर/आबीद शेख
अमळनेर : अतिक्रमित सफाई कामगारांची घरे हटविल्यानंतर पात्र पावतीधारकांना टाकर खेडा येथील म्हाडाच्या सदनिकांमध्ये घरे उपलब्ध करून द्यावीत, हॉटेल मिडटाऊन, मल्टिप्लेक्ससह सर्व आस्थापनांना वाणिज्यिक कर आकारावा तसेच गलवाडे रोड परिसरातील गट क्रमांक ५७ व ५८ मधील ‘गुगल आई रिसॉर्ट’चे अतिक्रमित बांधकाम हटवून डी.पी. रोड खुला करावा, या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.


या मागण्यांबाबत संबंधित प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आश्वासनानंतरही मागण्या प्रत्यक्षात मान्य करून त्यावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
“जोपर्यंत आमच्या मागण्या प्रत्यक्षात मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


अतिक्रमण हटवून पात्र सफाई कामगारांना हक्काची घरे मिळावीत, वाणिज्यिक आस्थापनांकडून नियमानुसार कर वसूल करावा आणि सार्वजनिक वापराचा डी.पी. रोड अतिक्रमणमुक्त करावा, या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलले जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed