गांधीजींचे सत्य, अहिंसा व समानतेचे विचार आजही मार्गदर्शक अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे गांधी जयंती उत्साहात; सर्वधर्मसमभाव व तळागाळातील जनतेसाठी कार्य करण्याचे आवाहन.

0

अमळनेर/आबीद शेख 


अमळनेर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. सकाळी ११ वाजता सुभाष चौक येथील श्री. लोटन अण्णा चौधरी यांच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी अमळनेर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री. भागवत गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, त्याग आणि समानतेच्या विचारांवर प्रकाश टाकला. तसेच आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत गांधीजींच्या विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली.
जिल्हा पदाधिकारी अॅड. रज्जाक शेख यांनी सर्वधर्मसमभाव, सद्भावना आणि देशातील सध्याची राजकीय परिस्थिती याबाबत विचार मांडले. ओबीसी विभागाचे जिल्हा पदाधिकारी श्री. मनोज पाटील यांनी महात्मा गांधींचे राजकीय विचार आजही दुःखित, पीडित तसेच तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. भागवत सूर्यवंशी यांनी आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार, श्री. गोळवलकर गुरुजी व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा महात्मा गांधींच्या विचार व कार्याशी तुलनात्मक संदर्भ देत आपले विचार मांडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. डी. एम. पाटील यांनी केवळ काँग्रेसपुरते मर्यादित न राहता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून काम करण्याचे आवाहन केले.


यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. तसेच श्री. ताराचंद नाना सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास श्री. लोटन अण्णा चौधरी, सईद तेली, राजेंद्र चौधरी सर, पी. वाय. पाटील, डॉ. रवींद्र पाटील, भिकाजी पाटील, शरद पाटील, राजू भाट, दिनेश पवार, एस. सी. तेले सर, मयूर पाटील यांच्यासह काँग्रेस व विविध घटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी श्री. गजेंद्र साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed