डुबकी मारुती मंदिर मार्गावरील कचऱ्याची नगरपरिषदेकडून तातडीने साफसफाई.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर : डुबकी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नाल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याची तक्रार प्राप्त होताच अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने तातडीने दखल घेत कारवाई केली.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यालगत तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना केले आहे. नागरिकांनी आपला कचरा नगरपरिषदेच्या अधिकृत कचरा संकलन व्यवस्थेकडे द्यावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

स्वच्छ आणि सुंदर अमळनेरासाठी नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे, असे आवाहन स्वच्छता विभागाकडून करण्यात आले आहे.

