अमळनेरमध्ये डासांचा वाढता उपद्रव; अस्वच्छता व तुंबलेल्या गटारींमुळे मलेरियासदृश आजारांची भीती नगरपालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम व डास प्रतिबंधक फवारणी करण्याची नागरिकांची मागणी.

0

अमळनेर आबिद शेख 

अमळनेर : शहरातील विविध भागांमध्ये अस्वच्छता, साचलेला कचरा आणि तुंबलेल्या गटारींमुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः जापान जीन आणि शहा आलम नगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव अधिक जाणवत असून, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.


या भागांमध्ये अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या असून त्यामध्ये सांडपाणी साचून राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच काही ठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे. साचलेले पाणी व घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डास प्रतिबंधक औषधांची नियमित फवारणी होत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. परिसरात तापासारख्या आजारांच्या तक्रारी वाढत असल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
जापान जीन व शहा आलम नगर परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवून तुंबलेल्या गटारी साफ कराव्यात, साचलेला कचरा हटवावा आणि डासांच्या निर्मूलनासाठी प्रभावी औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्याची परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी अमळनेर नगरपालिकेने तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed