दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी अशोक वाघ यांचा सर्वानुमते ठराव मंजूर अमळनेर तालुका सहकारी नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या बैठकीत निर्णय.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर तालुका सहकारी नोकरांची सहकारी पतसंस्था, मर्या. अमळनेर यांच्या माध्यमातून दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी श्री. अशोक पुंडलीक वाघ, उपसचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
हा ठराव दादासाहेब अशोक आधार पाटील, माजी सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र धनगर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व उपस्थित संचालकांनी एकमताने श्री. अशोक पुंडलीक वाघ यांच्या नावास मान्यता दिली.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. शिवाजी अभिमन मोरे, श्री. आबा मडकू बावा, संचालक श्री. दिनेश लक्ष्मीकांत पाटील, श्री. सुभाष अशोक खैरनार, श्री. नामदेव विनायक मालचे, श्री. प्रदीप वामन धनगर, श्री. निरंक सुभाष पाटील तसेच संस्थेचे सचिव श्री. भगवान कोंडाजी पाटील उपस्थित होते.

ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर श्री. अशोक पुंडलीक वाघ यांनी संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले. उपस्थित मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावामुळे अमळनेरच्या सहकार क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संस्थेच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

