कु. सायमा रज्जाक तेलीची राज्यस्तरीय GK-Quiz स्पर्धेच्या पुढील फेरीसाठी निवड; प्रताप महाविद्यालयात आनंदाचे वातावरण.
अमळनेर आबिद शेख

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील एम.एस्सी. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. सायमा रज्जाक तेली हिची राज्यस्तरीय “GK-Quiz Competition — Vikasit Bharat @2047” स्पर्धेच्या पुढील फेरीसाठी निवड झाल्याने महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली संचालक कार्यालय, जळगाव यांच्या वतीने २५ ऑगस्ट २०२६ रोजी CAMPUS से संसद (Atal Trade, Yuva Kadam) अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून कु. सायमा तेली हिने उल्लेखनीय कामगिरी करत पुढील फेरीत स्थान मिळविले. तसेच तिने पुढील टप्प्यासाठी घेण्यात आलेली ऑनलाइन मुलाखतही यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. शशिकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कु. सायमा हिने या स्पर्धेची तयारी केली. ऑनलाइन परीक्षा समन्वयक प्रा. वैशाली महाजन, प्रा. हेमलता सूर्यवंशी व प्रा. ममता महाजन यांच्यासह इतर प्राध्यापकांनी तिला उपयुक्त मार्गदर्शन व सहकार्य केले.
कु. सायमा तेलीच्या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरचे सर्व संचालक व पदाधिकारी तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, IQAC प्रमुख प्रा. डॉ. मुकेश भोळे, सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले.
याशिवाय CCMC विभागप्रमुख प्रा. डॉ. धनंजय चौधरी व सहप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या वतीनेही तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. विवेक बडगुजर, प्रा. डॉ. रामदास सुरडकर, प्रा. अवीत पाटील, प्रा. डॉ. विलास गावीत, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. प्रसाद मुठे, प्रा. हिमांशू गोसावी, प्रा. सुनील सपकाळे, प्रा. उमेश पाटील, प्रा. पडूळ तसेच CCMC विभागातील सदस्य आणि इतर प्राध्यापक व कार्यालयीन सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यालयीन अधिकारी राकेश निळे, श्री. भटू चौधरी व श्री. दुर्योधन नेरकर यांचे योगदानही विशेष उल्लेखनीय ठरले.
कु. सायमा तेलीच्या या यशामुळे प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थीवर्गात व सूक्ष्मजीवशास्त्र विभागात आनंदाची लहर पसरली असून, महाविद्यालयाच्या वतीने तिला पुढील फेरीसह भावी स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

