मातीशी खेळा, मूर्तीकार व्हा! अमळनेरात ३० ऑगस्टला विशेष कार्यशाळेचे आयोजन.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : स्वतःच्या हाताने मातीची मूर्ती तयार करून ती घरात बसविण्याचा आनंद अनुभवता यावा, तसेच लहान-मोठ्या सर्वांना सर्जनशीलतेची आणि निर्मितीची गोडी लागावी, या उद्देशाने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने ‘मातीशी खेळून बघा! मूर्तीकार व्हा!’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रस्ता, अमळनेर येथे होणार आहे. या उपक्रमातून सहभागी नागरिकांना स्वतःच्या हाताने मूर्ती निर्मितीचा अनुभव घेता येणार असून, पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती तयार करण्याचा संदेशही दिला जाणार आहे.

कार्यशाळेसाठी सहभागीांनी एक किलो शाडू माती, पाट किंवा लाकडी फळी, वाटी अथवा प्लॅस्टिक डबा, रिकामी रिफिल, रद्दी वर्तमानपत्र, पेन्सिल आणि पाण्याची बाटली सोबत आणावी.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या गुगल लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागीांनी संयोजक व संवादक यांच्या सूचनांचे पालन करून शांतता आणि स्वयंशिस्त राखावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणी लिंक : https://forms.gle/3oGgUaikLe5PSvMA9
अधिक माहितीसाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल : 9421702841, 9422278419, 9422790610, 9075570510.
‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींच्या विचारांना कृतीची जोड देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

