अमळनेरमध्ये गुजराथी समाजाचे एकत्रीकरण; ‘श्री समस्त गुजराथी समाज मंडळा’ची स्थापना.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : शहरातील गुजराथी समाजातील विविध पंथांना एका व्यासपीठावर आणत ‘श्री समस्त गुजराथी समाज मंडळा’ची स्थापना १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली. समाजातील सर्व घटकांनी एकसंघ राहून सामाजिक आणि समाजहिताचे कार्य करण्याच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी प्रेम रतीलाल शाह यांची एकमताने निवड करण्यात आली.


मंडळाची स्थापना होताच कार्यकारिणीची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे गुजराथी समाजातील विविध पंथ व घटकांना कार्यकारिणीत प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामुळे समाजातील विविध घटकांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, आगामी काळात सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


कार्यकारिणी अशी
अध्यक्ष : प्रेम रतीलाल शाह
उपाध्यक्ष : नितीनकुमार लहेरचंद शाह
सेक्रेटरी : चेतन हसमुखलाल गोसालिया
सहसेक्रेटरी : विजय प्रभूदास पटेल
खजिनदार : जितेंद्र रमेश जेठवा
सहखजिनदार : मनीष जगदीशचंद्र जोशी
संचार मंत्री : जितेंन कीर्ती कोठारी
सल्लागार : डॉ. रविंनचंद्र जैन, हरीशभाई जैन, उदय चदूलाल शाह.
कार्यकारी मंडळ : सतिशचंद्र सराफ, प्रतीक खंडेरिया, अतुल सोनी, डॉ. संजय शाह, येझदी भरुचा, विक्रम शाह, राजू नांढा, जितू गोहिल, हिमांशू शाह, धवल मेहता, कल्पेश कोठारी, प्रकाशभाई शाह.
विविध पंथांचा सहभाग
‘श्री समस्त गुजराथी समाज मंडळा’मध्ये काठियावाडी गुजराथी, श्री स्थानकवासी जैन, शीतलनाथ जैन, पटणी गुजराथी, जय श्री कृष्ण सराफ, गुजराथी ब्राह्मण, श्री कच्छी लोहार, वैष्णव समाज, गुजराथी मोची समाज, श्री भगवान स्वामीनारायण, कडवा पाटीदार, कच्छी लोडाया, खंडेरिया समाज आणि गुजराथी पटेल आदी समाजघटकांचा समावेश करण्यात आला आहे.
विविध पंथ, परंपरा आणि सामाजिक घटकांना एकत्र आणून समाजाच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा हा उपक्रम असून, मंडळाच्या माध्यमातून ‘एकता, सहकार्य आणि समाजहित’ या भूमिकेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed