जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात महायुतीचा भव्य मेळावा! अमळनेर तालुक्यातील सोसायटी ठरावधारक मतदारांसह जिल्हा बँकेच्या मतदारांची उपस्थिती; मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व उमेदवार राहणार उपस्थित.
अमळनेर/आबिद शेख 
अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका महायुतीच्या वतीने पदाधिकारी व मतदारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता धुळे रोडवरील कलागुरू मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडणार आहे.

अमळनेर तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पदाधिकारी, विविध सोसायट्यांचे ठरावधारक मतदार तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदारांना या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची भूमिका, संघटनात्मक तयारी आणि मतदारांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हा बँकेचे सर्व उमेदवार प्रमुख उपस्थिती लावणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, सोसायटीचे ठरावधारक आणि जिल्हा बँक निवडणुकीतील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुती अमळनेर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

