अ. गो. सराफ यांच्या स्मृतींना रविवारी आदरांजली बजरंग पॅलेस येथे जीवनमूल्ये व शैक्षणिक-सामाजिक कार्याचा जागर.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेरचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ. अ. गो. सराफ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रविवारी (दि. २३ ऑगस्ट) आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता बजरंग पॅलेस येथे ही सभा होणार आहे.


स्नेह, शिस्त, सचोटी, प्रामाणिकपणा, पर्यावरणप्रेम आणि वक्तशीरपणा अशा विविध जीवनमूल्यांचा आदर्श आपल्या आचरणातून घडविणारे डॉ. सराफ हे अमळनेरसह संपूर्ण खान्देशातील शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा स्मृतिसभेत आढावा घेतला जाणार आहे.
या आदरांजली सभेचे आयोजन डॉ. सराफ यांचे अमळनेर परिसरातील स्नेही, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गुजराथी वैष्णव समाज, सिनियर सिटीझन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, राष्ट्र सेवा दल, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, प्रताप महाविद्यालय प्राध्यापक संघटना, खान्देश शिक्षण मंडळ तसेच अमळनेर परिसरातील हितचिंतक व पत्रकार बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.


डॉ. सराफ यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी सर्व स्नेही, नागरिक व हितचिंतकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed