राष्ट्रपती पदकाने PSI मुजफ्फर सय्यद यांचा गौरव; कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा सन्मान.

0

24 प्राईम न्यूज 15 Aug 2026


अमळनेर : जळगाव पोलिस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून कार्यरत असलेले मुजफ्फर सय्यद यांना प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि समर्पित सेवेला मिळालेली ही गौरवाची पावती मानली जात आहे.


मुजफ्फर सय्यद यांनी पोलिस सेवेत कार्यरत असताना कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत जबाबदारीने सेवा बजावली. कायदा व सुव्यवस्था राखताना नागरिकांशी आपुलकीने आणि माणुसकीच्या भावनेने वागत त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली. कठीण प्रसंगीही संयम, तत्परता आणि कर्तव्यभावना कायम ठेवून त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल या सन्मानातून घेतली गेली आहे.


राष्ट्रपती पदक हा त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे. हा सन्मान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि परिचितांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलिस सेवेत प्रामाणिकपणे कार्य करत समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणारे मुजफ्फर सय्यद यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कर्तव्यदक्षता, माणुसकी आणि सेवाभाव यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या त्यांच्या कार्याचा राष्ट्रपती पदकाने गौरव झाल्याने जळगाव पोलिस दलासह परिसरातूनही त्यांचे कौतुक होत आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed