आदिवासी बांधवांसोबत आरिफ भायांनी साजरी केली आदिवासी जयंती.
अमळनेर/आबिद शेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद आरिफ भाया यांनी आज आपल्या आदिवासी बांधवांसोबत आदिवासी जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी आदिवासी समाजाच्या वतीने आरिफ भाया यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

आदिवासी समाजाच्या आनंदात सहभागी होत आरिफ भायांनी समाजबांधवांना आदिवासी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आदिवासी समाजाचे नेते पन्नालाल मावरे सर, संजय पवार माजी नगरसेवक, बल्ली पवार, धनराज पारधी तसेच आदिवासी समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

