कसाली मोहल्ल्यात बंद बोअरवेलला मिळाले ‘जीवनदान’; माजी नगरसेवक शेखा हाजी यांच्या पाठपुराव्याला यश पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा;
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरात सध्या पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत कसाली मोहल्ला अक्सा हॉल जावडीलअनेक दिवसांपासून बंद असलेली पाण्याची बोअरवेल पुन्हा सुरू करण्यात आली आहे. माजी नगरसेवक शेखा हाजी यांनी यासाठी पुढाकार घेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी (C.O.) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून बोअरवेल सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमळनेर शहरातील विविध भागांमध्ये सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेषतः कसाली मोहल्ला या परिसरातील नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

या पार्श्वभूमीवर परिसरात उपलब्ध असलेली बंद बोअरवेल सुरू करण्यासाठी माजी नगरसेवक शेखा हाजी यांनी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून बोअरवेल सुरू करण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले. अखेर प्रशासनाच्या सहकार्याने व आवश्यक कार्यवाही पूर्ण करून कासाली मोहल्यातील बंद बोअरवेल सुरू करण्यात आली.
बोअरवेल सुरू झाल्यामुळे कसाली मोहल्ल्यासह परिसरातील नागरिकांना पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध झाला आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची मोठी समस्या दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये’ या उद्देशाने केलेल्या पाठपुराव्याला यश
पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असल्याने उपलब्ध जलस्रोत कार्यान्वित करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर शेखा हाजी यांनी बोअरवेल सुरू करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पाणीटंचाईच्या काळात परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, शहरातील इतर बंद बोअरवेल, जलस्रोत आणि पाणीपुरवठा यंत्रणांचीही तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

