अमळनेरच्या इस्लामपुरा परिसरात पूरस्थिती; नागरिकांनीच दाखवली माणुसकी, जुम्म्याच्या नमाजासाठी लोडगाडीची व्यवस्था.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर :  इस्लामपुरा परिसरात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
परिसरातील अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना स्थानिक नागरिकांनी एकजुटीचे आणि माणुसकीचे दर्शन घडवले. मोहल्ल्यातील नागरिकांनी एकत्र येऊन गरजू कुटुंबांसाठी जेवणाची व्यवस्था केली तसेच पूरग्रस्तांना शक्य ती मदत केली.


शुक्रवार असल्याने जुम्म्याच्या नमाजासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिकांच्या पुढाकाराने लोडगाडीची व्यवस्था करण्यात आली. या वाहनाद्वारे अनेक नागरिकांना सुरक्षितपणे मशिदीपर्यंत पोहोचविण्यात आले.
मात्र, या गंभीर परिस्थितीत अद्यापही लोकप्रतिनिधी किंवा संबंधित प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी पोहोचले नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


नागरिकांनी प्रशासनाला तातडीने इस्लामपुरा परिसराची पाहणी करून पूरग्रस्त कुटुंबांना आवश्यक मदत व दिलासा देण्याची मागणी केली आहे. संकटाच्या काळात प्रशासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करणे हीच खरी लोकसेवा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed