राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर:-येथील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश राजमल जैन यांची राष्ट्रवादी व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी सदरची नियुक्ती केली आहे.आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष चेतन राजपुत,कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर,जितेंद्र ठाकुर,उपाध्यक्ष विजय पाटील,सरचिटणीस संदीप जैन,निलेश महाजन,युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान प्रकाश जैन हे अमळनेर शहरातील महावीर आईस्क्रीम चे संचालक असून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत.शहरातील व्यापारी बांधवांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पोहोचवून पक्षाचे संघटन वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed