आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सेवाभावी उपक्रम.
अमळनेर | आबिद शेख 
माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या वतीने वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे तसेच अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिलदादा पाटील यांनी यंदा वाढदिवस कोणताही जल्लोष न करता साजरा करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला होता. त्यांच्या या भूमिकेचा आदर राखत कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केले.
या प्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमपूर्वक भोजनाचे वाटप करण्यात आले. समाजाप्रती असलेली बांधिलकी, सेवाभाव आणि माणुसकी जपण्याची प्रेरणा आमदार अनिलदादा पाटील यांच्या कार्यातूनच मिळते. त्यांच्या सेवाभावी विचारांतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी आमदार अनिलदादा पाटील यांना उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडत राहावे, अशा शुभेच्छा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे यांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोरसे, ललित बाविस्कर, विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनीष देसले, उपाध्यक्ष हुझेफा पठाण, तालुका उपाध्यक्ष प्रणव चौधरी, युवक शहर कार्याध्यक्ष चैतन्य सनदाशिव, अंमळगाव येथील युवा नेते योगेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, सोशल मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी, प्रताप महाविद्यालय विद्यार्थी अध्यक्ष कुशन पाटील, विद्यार्थी सरचिटणीस तुषार ठाकरे तसेच यश पवार, समीर शेख, यश शेटे, अजय पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
