मातोश्रींच्या निधनानंतर मनोजबापू पाटील कुटुंबीयांचे बाळासाहेब थोरातांकडून सांत्वन; स्व. दाजीबा पाटील यांच्या कार्याला उजाळा

0

अमळनेर | आबिद शेख 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोज भाऊराव (मनोजबापू) पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय गं.भा. सुधा भाऊराव पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी दिवंगत सुधा भाऊराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. सांत्वन भेटीदरम्यान विधानपरिषदेचे माजी उपसभापती स्वर्गीय दाजीबा पर्वत पाटील यांच्या सार्वजनिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचाही गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
स्व. दाजीबा पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार चळवळीत दिलेल्या योगदानाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. १९८६ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती तसेच महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारताच्या वस्त्रोद्योगाचे प्रतिनिधित्व करत जपान, रशिया आणि जर्मनी या देशांचा दौरा केला होता. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या, याचीही उपस्थितांनी आठवण करून दिली.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पिताश्री सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि स्व. दाजीबा पाटील यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध, सहकार क्षेत्रातील कार्य आणि सार्वजनिक जीवनातील अनेक संस्मरणीय प्रसंग उपस्थितांसमोर सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, शेतकी संघाचे चेअरमन संभाजी लोटन पाटील, नगरसेवक राजू दादा फाफोरेकर, जितेंद्र ठाकूर, हेमंत पवार, शत्रुघ्न पाटील, महेश पाटील, विश्वनाथ ठाकरे, भागवत सूर्यवंशी, जुबेर पठाण, तुषार संदनशिव, पी. वाय. पाटील, रऊफ पठाण, शिवाजी पाटील, सौ. गौरी शिंगणे, सुधीर वाघ, प्रताप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शेवटी उपस्थितांनी दिवंगत सुधा भाऊराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत पाटील कुटुंबीयांना धीर दिला व त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed