पारस गोल्ड सुवर्ण पेढी दिवाळीसाठी सज्ज; प्रीमियम दागिन्यांची मजुरी फक्त 6.99 टक्के धनत्रयोदशी व दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी आकर्षक संधी; 22 कॅरेट हॉलमार्क दागिन्यांची भव्य व्हरायटी उपलब्ध.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : प्रकाशाचा आणि समृद्धीचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील पारस गोल्ड सुवर्ण पेढी ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त ग्राहकांना खास भेट देताना 22 कॅरेट हॉलमार्कच्या सर्व दागिन्यांची मजुरी केवळ 6.99 टक्के ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रीमियम डिझायनर दागिन्यांच्या खरेदीवरही ग्राहकांना या आकर्षक मजुरी दराचा लाभ मिळणार आहे.

याबाबत पेढीचे संचालक विनोद थोरात आणि संदीप थोरात यांनी सांगितले की, धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अनेक सर्वसामान्य ग्राहकांचे वर्षातून एकदा तरी मोठा आणि आकर्षक दागिना खरेदी करण्याचे स्वप्न असते. ग्राहकांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे आणि त्यांना परवडणाऱ्या दरात प्रीमियम डिझायनर दागिने खरेदी करता यावेत, यासाठी पारस गोल्डतर्फे केवळ 6.99 टक्के मजुरीची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिवाळीच्या सणाला सोने खरेदी करणे हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नोकरदार वर्ग, व्यापारी, व्यावसायिक तसेच शेतकरी वर्गाकडूनही पारस गोल्ड सुवर्ण पेढीला पसंती दिली जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार 22 कॅरेट हॉलमार्क दागिन्यांची आकर्षक आणि विविध प्रकारची व्हरायटी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यंदाच्या दिवाळीसाठी मंगळसूत्र, नेकलेस, पाटल्या, बांगड्या, चोकर यांसह मोठ्या आणि प्रीमियम डिझायनर दागिन्यांचे खास कलेक्शन उपलब्ध झाले आहे. सोने खरेदीत गुंतवणुकीसोबतच हौसेची पूर्तता करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. त्यातच विविध योजनांची जोड आणि 6.99 टक्के मजुरीमुळे ग्राहकांचा खरेदीचा आनंद अधिक द्विगुणित होणार आहे.

दिवाळीच्या या मंगलमय पर्वात सोने खरेदीचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांनी पारस गोल्ड सुवर्ण पेढी, लुल्ला मार्केट, अमळनेर येथे अवश्य भेट द्यावी, असे आवाहन पेढीच्या वतीने संचालक विनोद थोरात व संदीप थोरात यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed