ISRO च्या विशेष वैज्ञानिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अफरोज खाटीकची निवड; चाळीसगावचा गौरव.

0

24 प्राईम न्यूज 23 Jun 2026
चाळीसगाव येथील खाटीक समाजाचे मान्यवर डॉ. मोहम्मद रफीक हाजी बिस्मिल्लाह खाटीक यांची कन्या कु. अफरोज खाटीक हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या केरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष वैज्ञानिक प्रशिक्षण व परीक्षण कार्यक्रमासाठी परिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून निवड झाली आहे.


अफरोज हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर हे यश संपादन केले असून तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे चाळीसगाव शहरासह खाटीक समाज आणि संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही ती विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात नवे शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कु. अफरोज खाटीक हिचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed