महापुरुषांचा अवमान करणाऱ्या रिलायन्स जियो स्मार्ट बाजार , अमळनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर शहरातील ढेकू परिसर येथील राजर्षी शाहू महाराज सर्कल येथे बहुजन समाजाला त्यांचा न्याय व हक्क मिळवून देणारे तसेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे फलक राजमुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने
मागील १० वर्षापासून लावलेले असून त्या फलकावर मागील १५ दिवसापासून रिलायन्स जियो स्मार्ट बाजार , अमळनेर या व्यवसाईक कंपनीने अनधिकृतपणे त्यांचा जाहिरात फलक लावून राजर्षी शाहू महाराज यांचा अपमान करून तमाम बहुजन समाजाच्या भावना दुखवील्या असून रिलायन्स जियो स्मार्ट बाजार , अमळनेर शाखा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अश्या मागणीचे निवेदन राजमुद्रा
फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील यांनी दिले असून यावेळी अमळनेर तालुका मराठा समाजाचे संचालक संजय पाटील , भारतीय जनता पक्षाचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश महाजन , शिवसेना कार्यकर्ते सुरज परदेशी , हर्षल महाजन , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार हे उपस्थित होते
