तेली समाजातील पहिला एमबीबीएस डॉक्टर; आमदार अनिल पाटील यांनी केला सत्कार.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : अमळनेर येथील साई पापड उद्योगाचे संचालक रविंद्र चौधरी व सौ. सरला चौधरी यांचे सुपुत्र डॉ. हेमंत चौधरी यांनी नुकतेच एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून अमळनेरसह परिसरातील तालुक्यात तेली समाजातून पहिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन चौधरी दाम्पत्याचा सत्कार केला तसेच डॉ. हेमंत यांना पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष संजय चौधरी, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, उद्योजक चंद्रकांत चौधरी, देविदास देसले, भाजपाचे माजी शहराध्यक्ष शितल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, पत्रकार किरण पाटील, बाळासाहेब शिसोदे, गोविंदा बाविस्कर तसेच मित्रपरिवार उपस्थित होता.

डॉ. हेमंत चौधरी हे अत्यंत गुणवंत विद्यार्थी असून त्यांनी पालघर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते इंटर्नशिप करत असून त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन अमळनेर येथे वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांचा मानस असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आमदारांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
