शिरूड जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्यांचे आगमन.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरूड येथे प्रवेशोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना श्री. धनराज आत्माराम पाटील यांनी आकर्षक सजविलेल्या बैलगाडीतून शाळेत आणून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान गावातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सभापती शाम अहिरे, माजी मुख्याध्यापक एन. टी. पाटील, नानासाहेब जयवंतराव पाटील, आप्पासाहेब आधार धनगर, विजय पाटील, गुलाबराव पाटील, संदीप पाटील, भैय्यासाहेब पाटील, बापूराव पाटील, आप्पा मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शाळेत आगमनानंतर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळापूर्व तयारी मेळावा-२ चे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय आधार पाटील, उपाध्यक्ष मुकेश पाटील, सदस्य उज्वला पाटील, ज्ञानेश्वर माळी, कल्पेश भिल, संजय धनगर, मुख्याध्यापक किरण मारवडकर, अंगणवाडी सेविका सौ. सीमा कुलकर्णी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगीता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. कल्पना बडगुजर, इंदुबाई महाले, रवींद्र महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
