आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. -पेट्रोल-डिझेलची बाटल्या व कॅनमधून विक्री बंद; अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा..

24 प्राईम न्यूज 23 मे 2026
जळगाव : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल व डिझेल पंपधारकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी 25 मार्च 2026 रोजी आदेश निर्गमित करत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त साठेबाजी करू नये. पेट्रोल पंप चालकांनी तांत्रिक कारण किंवा प्रत्यक्ष साठा संपल्याशिवाय “नो स्टॉक” फलक लावू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच पेट्रोल व डिझेलची बाटल्या, कॅन किंवा इतर भांड्यांमध्ये विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या पंपधारकांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 व पेट्रोलियम अधिनियम 1934 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पेट्रोल पंपांवर वाढणारी गर्दी लक्षात घेता वाहनांच्या रांगांचे योग्य नियोजन करावे, मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवून सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नागरिकांनाही प्रशासनाने आवाहन केले असून पॅनिक बायिंग टाळण्याचे सांगितले आहे. घरामध्ये किंवा दुकानांमध्ये अनधिकृतरीत्या पेट्रोल-डिझेलचा साठा करणे हा गुन्हा असून त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांच्या साठ्याची पुरवठा विभागामार्फत नियमित तपासणी सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ राबविण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
रवि ज्वेलर्स,
सराफ बाजार, अमळनेर,
Mob. 70 74 74 21 21.
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 152500
22 Ct सोने 91.60% : ₹. 142500
18 Ct सोने 75.00% : ₹. 117500
शुद्ध चांदी 999%:₹. 2650/-
भाव प्रती 10 ग्राम
