अमळनेरमध्ये गॅस डिलिव्हरीचा बोजवारा; आम आदमी पार्टीचे पुरवठा विभागाला निवेदन. वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त; ग्रामीण भागात वाहनांची कमतरता..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : तालुक्यातील घरगुती गॅस वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी, अमळनेर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे निवेदन देण्यात आले. गॅस सिलेंडरची वेळेवर डिलिव्हरी होत नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक ग्राहकांनी गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही १० ते १५ दिवसांपर्यंत डिलिव्हरी मिळत नाही. त्यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर गॅस वितरण करणारी वाहने नियमित जात नसल्याने खेड्यातील नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याशिवाय काही गॅस एजन्सीकडून “गॅस उपलब्ध नाही”, “वाहन खराब आहे” अशी कारणे देत ग्राहकांना टाळले जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पुरवठा विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सर्व गॅस एजन्सींची बैठक घ्यावी व घरपोच गॅस वितरण सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 151000
22 Ct सोने 91.60% : ₹. 139700
18 Ct सोने 75.00% : ₹. 116300
शुद्ध चांदी 999%:₹. 2580/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
