‘शिरपूर येथील आर. सी. पटेल उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या सय्यद अबरार सर यांना Appreciation Certificate’ प्रदान..
24 प्राईम न्यूज 1 मे 2026
शिरपूर (धुळे) – येथील आर. सी. पाटील उर्दू माध्यमिक विद्यालयाचे SOF (Science Olympiad Foundation) ओव्हरऑल कोऑर्डिनेटर सय्यद अबरार शकील यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘Appreciation Certificate’ प्रदान करण्यात आला आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात SOF ऑलिंपियाड परीक्षांचे यशस्वी आयोजन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रभावी समन्वय साधल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि नियोजनक्षमतेमुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑलिंपियाड परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
गणेश कॉलनी, शिरपूर येथील या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने प्रगती साधत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सय्यद अबरार शकील यांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांविषयी आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या यशामध्ये मोठा वाटा उचलला गेला आहे.
या सन्मानाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील काळातही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
