जळगाव-दिल्ली विमानसेवा २ मेपासून सुरू; खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश..

0
New-Doc-04-25-2026-23.29.jpg


24 प्राईम न्यूज 26 एप्रिल 2026
जळगावकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, जळगाव-दिल्ली विमानसेवा २ मे २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे तसेच खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही सेवा सुरू होत आहे. आमदार राजूमामा भोळे यांनीही या सेवेसाठी पाठपुरावा केला होता.


अ‍ॅलियन्स एअर कंपनीमार्फत दिल्ली-इंदूर-जळगाव आणि जळगाव-इंदूर-दिल्ली अशी त्रि-साप्ताहिक (मंगळवार, गुरुवार आणि शनिवार) विमानसेवा उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे जळगाव येथील प्रवाशांना दिल्लीसह उत्तर भारतातील विविध शहरांशी थेट हवाई जोडणी मिळणार आहे. विशेष म्हणजे तिकीट दर ₹३,००० पासून सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांसाठीही ही सेवा परवडणारी ठरणार आहे. सध्या बुकिंग सुरू झाले आहे.


खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि संबंधित कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, ही सेवा प्रायोगिक स्वरूपात सुरू होत आहे.
या विमानसेवेच्या माध्यमातून जळगावकरांना दिल्ली व इंदूर येथे जाणे-येणे अधिक सोयीचे होणार असून, धार्मिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवासालाही चालना मिळणार आहे. १ मे ते ३१ मे या कालावधीत प्रायोगिक सेवा यशस्वी ठरल्यास भविष्यात नियमित आणि विस्तारित सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या नव्या सेवेमुळे जळगाव विमानतळाचे महत्त्व वाढणार असून, जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक उद्योगपती आणि प्रवासी संघटनांनी व्यक्त केला आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 152000

22 Ct सोने 91.60% : ₹. 139800

18 Ct सोने 75.00% : ₹. 115500

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed