अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन राजपूत यांची नियुक्ती; बन्सिलाल पॅलेसमध्ये भव्य स्वागत..

0
New-Doc-04-25-2026-09.44.jpg


अमळनेर /आबिद शेख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी चेतन राजपूत यांची नियुक्ती जाहीर होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी अमळनेर येथील बन्सिलाल पॅलेस येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य बूथ मेळावा आयोजित करण्यात आला होता.


या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी चेतन राजपूत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर आमदार अनिल दादा, जयश्री ताई, तिलोत्तमा ताई यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मंचाच्या मध्यभागी योगेश पाटील, अशोक आधार पाटील, मुख्तार खाटीक व भागवत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.


नवीन शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चेतन राजपूत यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बूथ मेळाव्यास शहरातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण कार्यक्रमात ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 151500

22 Ct सोने 91.60% : ₹. 139400

18 Ct सोने 75.00% : ₹. 115200

शुद्ध चांदी 999%:₹. 2480/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed