क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात..

0
New-Doc-04-14-2026-06.15.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर :- क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शहरात आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि प्रतिसादात पार पडली. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य व आरोग्याचा संदेश देण्यात आला.


स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पीएसआय काकडे, पत्रकार किरण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, सिद्धार्थ शिसोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळच्या उत्साही वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक, युवती तसेच विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


पुरुष गटात तेसज सपकाळे (नाशिक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय, तर खुमानसिंग ठाकरे (धडगाव) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना अनुक्रमे ७०००, ५००० व ३००० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
महिला गटात उन्नती पाटील यांनी प्रथम, आरती पाटील यांनी द्वितीय तर ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५०००, ३००० व २००० रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्ष नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्यासह अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव, सुनील वाघ, सुनील करंदीकर, गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव, गोकुळ बिऱ्हाडे, प्रा. कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील, भिका संदानशिव, राजेंद्र संदानशिव, समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव, जितेश संदानशिव, तुषार संदानशिव, परम चव्हाण, शुभम घोलप, अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे, सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव, संदीप संदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील आदींनी परिश्रम घेतले.
महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता जाधव, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण, गौतमी चव्हाण आदी उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे शहरात सामाजिक एकोपा व आरोग्याबाबत जनजागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 150200

22 Ct सोने 91.60% : ₹. 138200

18 Ct सोने 75.00% : ₹. 114200

शुद्ध चांदी 999%:₹. 2430/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed