पदयात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी चोपडा–अमळनेर मार्गावर जड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : संकल्प युवा फाऊंडेशन अमळनेर यांच्या वतीने अमळनेर येथील मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन दिनांक २६ मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत चोपडा ते अमळनेर मार्गावर जड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

संस्थेचे अध्यक्ष पंकज संतोष शेटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी श्री सप्तश्रृंगी गड येथे दर्शनासाठी पायी जातात. यंदा २६ ते २७ मार्च या कालावधीतही चोपडा ते अमळनेर या मार्गावर पदयात्रींची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या मार्गावर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय पदयात्रेकरूंच्या गर्दीमुळे जड वाहनांना मार्ग काढणे कठीण होते, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन भाविकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच वळणाच्या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

म्हणूनच २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून ते २७ मार्च २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत चोपडा ते अमळनेर हद्दीपर्यंत सर्व प्रकारची जड व अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी किंवा पर्यायी मार्गाने वळवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत अमळनेर पोलीस स्टेशन येथेही देण्यात आली आहे.
ही माहिती गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हा खजिनदार यांच्या वतीने देण्यात
