अमळनेरमध्ये कारी अझहर नुरी यांची शहर इमाम व काझी म्हणून नियुक्ती; अल खिदमत ट्रस्टतर्फे सत्कार..

0
New-Doc-03-25-2026-07.10.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शहरातील ईदगाह मैदानात हाफिजो-कारी अझहर नुरी यांना इमामत करण्याचा पवित्र सन्मान मिळाल्याने धार्मिक वातावरणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच त्यांना शहर इमाम व काझी-ए-शहर हा मानाचा दर्जाही प्रदान करण्यात आल्याने


अल खिदमत ट्रस्ट अमळनेर यांच्या वतीने कारी अझहर नुरी यांचा पुष्प गुच्छ देऊन विशेष सत्कार व स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम अल खिदमत ट्रस्ट च्या ऑफीस मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात उपस्थितांनी कारी अझहर नुरी यांना पुढील धार्मिक कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच अल्लाह तआलाने त्यांना दीन व समाजसेवेसाठी अधिक ताकद व बरकत द्यावी, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी शहरातील धर्मगुरू, समाजातील मान्यवर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed