मारवड महाविद्यालयात कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना धनादेश वितरीत..

0
New-Doc-03-25-2026-00.57-1.jpg

आबिद शेख/अमळनेर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग व मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयात प्रवेशीत

आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून, “कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना” दरवर्षी राबविण्यात येते.
याअंतर्गत विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ऑफ तासिकांच्या वेळी महाविद्यालयातच विविध प्रकारची कामे करत असतात. त्या मोबदल्यात त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येते.


शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अशा 3 विद्यार्थीनींना या योजनेअंतर्गत ग्राम विकास शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. आबासो. देविदास शामराव साळुंखे तसेच संचालक मा. श्री. भैय्यासाहेब दिनेश वासुदेव साळुंखे, मा. श्री. दादासाहेब मनोज हिंमतराव साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पवन पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रो. डॉ. जितेंद्र माळी. भाऊसो. श्री. सचिन पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, सर्व प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed