धार येथे ईदचा सण उत्साहात साजरा; ईदगाह मैदानावर भाईचाऱ्याचा संदेश..

0
New-Doc-03-22-2026-07.00.jpg

आबिद शेख/ अमळनेर
ईद-उल-फितर निमित्त धार, ता. अमळनेर येथे आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. धार येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा केली व देशात तसेच समाजात अमन-शांती व भाईचारा कायम राहावा अशी प्रार्थना करण्यात आली.


या वेळी मारवाड पोलीस स्टेशनचे पीआय यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व अमळनेर तालुक्याचे आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांनी धारवासीयांना दूरध्वनीद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या. अमळनेर तालुक्याचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनीही सर्व नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.


ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने मारवाड पोलीस स्टेशनच्या पीआय यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी अलीम मुजावर, व्ही. एन. मुजावर, हाजी नईम मुजावर, बाबू पेंटर, जाकीर भाई शेख, नईम पठाण, सलादिन मुजावर, नासिर मुजावर, सत्तार मुजावर, राजीक मुजावर, शौकत सय्यद, मुशिर मुजावर, अजीम मुजावर, जमील ड्रायव्हर, मुन्ना मिस्तरी आदी उपस्थित होते.
तसेच गावातील हिंदू बांधवांनीही मुस्लिम समाजातील नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम मुजावर यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही. एन. मुजावर यांनी केले.
धार, अमळनेर येथे साजऱ्या झालेल्या या ईद उत्सवातून गावात एकात्मता आणि सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed