महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान; विविध उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहात..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : मराठी वाङ्मय मंडळ व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. १५ मार्च २०२६ रोजी नांदेडकर हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांचा सन्मान, मार्गदर्शनपर व्याख्याने व विविध उपक्रमांनी वातावरण उत्साहपूर्ण झाले.

कार्यक्रमासाठी जळगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर स्वाती परीक्षित बाविस्कर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या, तर सौ. अनिता शिरीष चौधरी या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांची ओळख सौ. सुरेखा बाविस्कर यांनी करून दिली. आपल्या भाषणात डॉ. बाविस्कर यांनी ज्येष्ठ महिलांचे घरातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे उदाहरणांसह स्पष्ट केले. कोरोना काळात कुटुंबातील ज्येष्ठांनी निभावलेली जबाबदारी सांगत त्यांनी ज्येष्ठांच्या आरोग्य व आहाराबाबतही मार्गदर्शन केले.

त्यामुळे आजच आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हा.
सौ. सुनीताताई शिरीष चौधरी यांनीही महिलांशी संवाद साधताना, “ज्येष्ठ महिला या घराचा कणा असतात,” असे सांगत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कुटुंबाने पार पाडावी, असे मत व्यक्त केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. वसुंधरा लांडगे यांना सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाकडून सन्मानित करण्यात आले. प्रा. उषा पाटील यांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. मानपत्र, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. मनोगत व्यक्त करताना लांडगे यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत मंडळाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कांचनताई शहा होत्या. त्यांनी योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याचे समाधान व्यक्त केले.
त्यानंतर अमळनेर नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेविका तसेच खा.शि. मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील व कार्यकारिणी सदस्या सौ. लीना पाटील यांचा मोगऱ्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. योगिता कापडणेकर, माधुरी पाटील व नगरसेविका कल्पना शर्मा यांनी मनोगत व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले.
व्यसनमुक्ती विषयावर आयोजित घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली. पल्लवी बागुल, अरुणा अलई व योगिता कापडणेकर यांना प्रथम क्रमांक, तर भारती कोळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
